शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या भीतीने पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू; श्रीरामपुरातील घटना

By शिवाजी पवार | Updated: March 12, 2023 17:23 IST

लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील तो संशयित आरोपी आहे.

श्रीरामपूर : जालना जिल्ह्यातील पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच अटकेच्या भीतीने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. तरुणावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू होते.

मयत तरुणाचे नाव जाकीर बबन पठारे (रा. दत्तनगर, पुणतांबा रोड, श्रीरामपूर) असे आहे. लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील तो संशयित आरोपी आहे. जालना जिल्ह्यातील गौंडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. त्याच्या तपासाकरिता शनिवारी तेथील पोलिस दत्तनगरला आले होते. ही माहिती मिळताच पठारे हा दुकानामध्ये गेला.             श्रीरामपूर शहरालगत असलेल्या दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीत एका वेल्डिंग वर्क्समध्ये पठारे याने पेटवून घेतले. पोलिस आपल्याला अटक करतील, अशी त्याला भीती होती. घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. नातेवाईकांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला लोणीला हलविण्यात आले.

दरम्यान, हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तपास पद्धतीवर त्यांचे आक्षेप आहेत. रविवारी सायंकाळी दत्तनगर येथील अमरधाममध्ये पठारे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरPoliceपोलिस