अहमदनगर: महानगरपालिकेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा येथील पोलीस मुख्यालयात मृत्यू झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.सतीश सुभाष जगताप (वय ३९ रा. जामखेड) असे मयत होमगार्डचे नाव आहे़ जगताप हे जामखेड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. बाहेरून आलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या निवासाची पोलीस मुख्यालयात व्यवस्था करण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्री जगताप हे सहका-यांसमवेत झोपले होते. रात्री झोपेतेच त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी जगताप यांच्या सहका-याच्या निदर्शनास आली. जगताप यांचा मृत्यू नेमका होणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. शवविच्छेदनासाठी जगताप यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जगताप यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
मनपा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:19 IST