शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील दगड कोसळून सावरगावातील मुलाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:40 IST

सावरगाव येथील आपल्या मावशीकडे राहत असलेल्या गोवर्धन विठ्ठल गंडे (वय-१५) या मुलाच्या डोक्यात विहीरीवरीचा दगड पडल्याने जागीच मृत्यू झाला.

जामखेड : सावरगाव येथील आपल्या मावशीकडे राहत असलेल्या गोवर्धन विठ्ठल गंडे (वय-१५) या मुलाच्या डोक्यात विहीरीवरीचा दगड पडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मयत गोवर्धन विठ्ठल गंडे (रा. चोरपुरी, ता. गेवराई, जिल्हा - बीड) हल्ली रा. सावरगाव, ता. जामखेड) हा लहाणपणीच त्याची आई वारली असल्याने तो  सावरगाव येथील मावशी शितल व काका लक्ष्मण बाबासाहेब गोरे यांच्याकडे राहत होता. सोमवार (दि. १८) रोजी सकाळी तो शिऊर जवळील फाळकेवाडी या ठिकाणी कामा निमित्त गेला होता.  याच दरम्यान संतोष फाळके यांच्या विहीरीचे काम सुरू होते. त्यावेळी गोवर्धन विहीरीत उतरला. याच वेळी विहीरीच्या वरील बाजुचा एक दगड त्याच्या डोक्यात पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्याला ग्रामस्थांनी तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयत घेऊन गेले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मुत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर