याबाबत संस्थानने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी श्रीक्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रयांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली वावरत असताना सावधगिरीची उपाययोजना म्हणून शासन, प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. कार्तिकी एकादशी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने शासन, प्रशासनाने श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी येथे जारी केलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुभवामुळे श्री दत्त मंदिर संस्थान प्रशासन व भाविकांच्या विचारविनिमयातून यावर्षीचा श्री दत्त जयंती सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दत्त जयंती सप्ताहादरम्यान दूरवरूनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून, भगवान दत्तात्रयांच्या जन्मदिनी म्हणजेच मंगळवारी दुपारी चार वाजेपासून महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. श्री दत्तजन्म सोहळा श्री दत्त मंदिरातच होणार असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये. श्री दत्त जन्मसोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी मंदिर परिसर, तसेच पार्किंग क्षेत्रात ठिकठिकाणी एलसीडी स्क्रीन लावण्यात येतील, याचा सर्वांनी लाभ घेऊन मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळावी, असे आवाहनही भास्करगिरी महाराजांनी केले आहे.
..
१५देवगड
...