शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निषेधासाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच केला दशक्रिया विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:17 IST

श्रीगोंद्यातील तरुण शेतकरी संदेश अनिल आढाव (वय १७, रा.सारोळा सोमवंशी, ता.श्रीगोंदा) याच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबीयांनी महावितरणाच्या अहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी सकाळी केला. 

      अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुण शेतकरी संदेश अनिल आढाव (वय १७, रा.सारोळा सोमवंशी, ता.श्रीगोंदा) याच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबीयांनी महावितरणाच्याअहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी सकाळी केला. प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली हा विधी कार्यक्रम झाला. या विधी कार्यक्रमामुळे महावितरणाच्या अहमदनगर जिल्ह्यातील गलथान कारभाराचा विषय चर्चेत आला आहे. मयत संदेशचे वडील अनिल आढाव व त्यांचे कुटुंब हे शेतकरी आहेत. सारोळा सोमवंशी येथे घटनेच्या ३ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता आढाव कुटुंब शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. घरी येत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक संदेशला लागला होता. संदेशला वाचविण्यासाठी त्याची बहीण प्रतीक्षा हे देखील पुढे सरसावली होती. हे दोघे तारेच्या विद्युत प्रवाहाशी चिकटलेले असताना त्यांना वाचविण्यासाठी संदेश आणि प्रतिक्षाची आई रोहिणी धावल्या. त्यांनाही शॉक बसला. रोहिणी यांनी धाडस व प्रसंगावधान दाखवून हाताला कपडा गुंडाळून प्रतिक्षाला सुरूवातीला तारेला चिकटलेल्या संदेशपासून वेगळे केले. त्यानंतर प्रतीक्षा बेशुद्ध पडली होती. तर संदेश याचा जागीच मृत्यू झाला होता.वीज खांबावरील विद्युत तार शेतात पडली असल्याची माहिती देऊनही त्याची दुरूस्ती झाली नाही. घटनेच्या दुसºया दिवशीही विद्युत तारा शेतात तशाच पडून होत्या. त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. या घटनेचा निषेध म्हणून आढाव कुटुंबीयांनी सोमवारी महावितरणच्या अहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संदेश याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात श्रीगोंद्यातील सारोळा सोमवंशी येथील गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रवचनकार अजय बारस्कर महाराज, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, विजू बाळू भंडारी, कृष्णाभाऊ खांबकर, वामन बधे, सत्यवान शिंदे, संतोष गायकवाड, विजू बापू भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.पोलीस बंदोबस्तात विधीसंदेशच्या दशक्रिया विधीला होणारे सर्व विधी यावेळी अहमदनगर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी महावितरण कार्यालयात आलेले ग्राहक आणि कार्यालयातील अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. विधी कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त होता.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण