शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:30 IST

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़ स्फोटामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे़जिलेटिन स्फोट करून मासेमारी करणे हे बेकायदेशीर असतांना पाटबंधारे खाते मात्र अनभिज्ञ आहे़ एकीकडे पाण्याची पातळी खाली जात असतांना दुसरीकडे जिलेटीनचा वापर करून केल्या जाणा-या मासेमारीबाबत पर्यावरण पे्रमींनी चिंता व्यक्त केली आहे़ मासेमारी विभागानेही गंभीर प्रकरणाक डे दुर्लक्ष केले आहे़ मुळा धरणात विषारी भात टाकून मासेमारी केली जात असतांना लोकमतमध्ये लेखमाला प्रसिध्द करून भांडाफोड करण्यात आला होता़ मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विषारी मासेमारी बंद पडली होती़ आता मासेमारी करणा-यांनी जाळयाचा वापर करण्याऐवजी थेट पहाटे जिलेटीनचा स्फोट करून मुळा धरणाचा परिसर दणाणून सोडला आहे़मुळा धरणात जिलेटीनव्दारे मासेमारी करणे हे बेकायदेशीर आहे़ पाटबंधारे खात्याला स्फोटाची कल्पना असतांनाही बघ्याची भुमिका घेतली जात आहे़ पाटबंधारे खात्याकडे संरक्षणासाठी कर्मचारी नाहीत़ यासंधीचा फायदा घेत मासेमारी करणारे जाळे टाकून मासेमारी करण्याऐवजी थेट जिलेटीनचा स्फोट घडवून आणतात़ त्यामुळे एकाच वेळी मोठया प्रमाणावर मासे उपलब्ध होतात़ संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे़पाटबंधारे खात्याचा संबंध पाण्याशी आहे़ पाण्याचे नमुने दरमहा तपासले जात आहेत़ मच्छमारी विभागाने टेंडर काढून त्याचा ठेका दिलेला आहे़ जिलेटीनचा स्फोट होत असल्यास त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदार ठेकेदाराची आहे़ -अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण अभियंता

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी