शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:55 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात.

अहमदनगर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात, मात्रसध्या या धरणांत ४० टक्केही पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्वच स्थिती चिंताजनक बनली आहे.मागील वर्षी जुलैअखेर सरासरी ४३ टक्के पाऊस झाला होता. यातही पाणलोटात चांगला पाऊस असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांत झपाट्याने पाण्याची आवक झाली. मागील वर्षी २५ जुलैला भंडारदऱ्यात ८४ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो केवळ ४५ टक्के आहे. तसेच मुळा धरणात मागील वर्षी ५६ टक्के व निळवंडेत ६५ टक्के असलेला साठा यंदा अनुक्रमे ३२ व २० टक्क््यांवर खाली घसरला आहे.भंडारदरा धरण दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत भरते. मागील वर्षीही ते भरले होते. परंतु यंदा मात्र ते १५ आॅगस्टपर्यंत भरेल अशी स्थिती नाही. अकोले तालुक्यात पुढील २० दिवस सलग पाऊस झाला तर धरण भरण्याच्या आशा आहेत. अन्यथा १५ आॅगस्टची ही परंपरा मोडण्याची शक्यता आहे. मुळा धरणात मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत मुबलक पाणीसाठा झाला होता. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. धरणांतील पाण्यानेच संपूर्ण जिल्ह्याची तहान भागवली.अजूनही मागील वर्षीच्या पाण्यावरच सातशेहून अधिक टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.मात्र यंदा धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नाही. सध्या तो सुरू असला तरी त्याला अपेक्षित वेग नाही. त्यामुळे पाण्याची आवक मंद गतीने होत आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी धरणसाठे निम्म्यापेक्षा खाली असल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत.दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर (५० टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने या पिकांना सध्या तरी संजीवनी मिळाली आहे. परंतु जमिनीतील पाणीपातळी वाढेल असा सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे.मागील वर्षी २५ जुलैपर्यंत सरासरी २१३ मिमी (४३ टक्के) पाऊस झाला होता. यंदाही तो ४३ टक्के आहे. मात्र पाणलोटात कमी आहे. यंदा श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या सहा तालुक्यांत ३० टक्क्यापेक्षा कमी पाऊस आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी