शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दत्त जयंतीनिमित्त देवगडला भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:29 IST

मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आज पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली.

नेवासा : मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आज पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली.    गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे साडेतीन वाजता भगवान श्री गुरू दत्तात्रयांच्या मूतीर्चे पूजन करून अभिषेक घातला. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी महाआरती बरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. नगर जिल्ह्यासह मराठवाडा व राज्यातील भाविक सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी करत असून दुपारी तीन वाजेनंतर श्री दत्तजन्म सोहळ्यास सुरवात होऊन सायंकाळी ६ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार असून यावेळी धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत.     वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक ही संस्थानच्या वतीने तैनात करण्यात आले आहे. नेवासा, नगर, श्रीरामपूर, गंगापूर, शेवगाव या आगरातून भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.संपूर्ण देशासह आज श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जन्म सोहळा पार पडत आहे. दिवसभरात सहा ते सात लाखांपर्यंत भक्त गण भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होतील. सायंकाळी सहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात दत्त नामाच्या जयघोषयात दत्तजन्म सोहळा संपन्न होणार आहे. - गुरुवर्य भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थान

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा