शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नगर जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ पॉझिटिव्ह; ६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:32 IST

नगर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९ मे) एकाच दिवशी तब्बल नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ११२ झाली आहे. 

 अहमदनगर :  जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९ मे) एकाच दिवशी तब्बल नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ११२ झाली आहे. 

      यामध्ये घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला १, ठाणे येथून  पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथे आलेला १, संगमनेर येथील २, तर निमगाव (राहाता) येथील ४ जणांचा समावेश आहे. बाधीत रुग्णामध्ये ४ पुरुष, ४ महिला आणि ४ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे.

    राहाता तालुक्यातील निमगाव येथे शुक्रवारी जे चौघे पॉझिटिव्ह आढळले. त्या व्यक्ती तेथीलच यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे.

   संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने संगमनेर ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. तर  दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने पाठवले होते. जिल्हा रुग्णालयात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपकार्तील आहे. चाकण येथून शेवगाव तालुक्यातून ढोरजळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवकही बाधित आढळला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या