अहमदनगर-अलिबाग येथून अंदाजे ताशी १०० कि.मी. वेगाने वादळ पुढे सरकले आहे. अहमदनगरच्या दक्षिणबाजुने हे वादळ पुढे नाशिकला जाणार आहे. या वादळाचा नगरला अजिबात धोका नसून मोठा पाऊस आणि सोसाट्याचा वारा मात्र होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. लोकमतने आज स्कायमेटशी याबाबत संवाद साधला.याबाबत स्कायमेटचे प्रॉडक्ट मॅनेजर मकरंद कुलकर्णी म्हणाले, वादळाचा प्रवास पुणे ते नाशिक असा राहील. त्यामुळे या मार्गावर येणाºया दोन्ही बाजुंनी मोठा पाऊस येणार आहे. नाशिकमध्ये हे वादळ पोहोचल्यानंतर त्याचा वेग कमी होईल. पुढे ते धुळे, नंदुरबारमार्गे मध्यप्रदेशात जाईल. त्यानंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होईल. तसेच जोरदार पाऊस पडेल.अलिबाग येथून हे वादळ पुढे सरकले आहे. त्यामुळे अहमदनगरमध्येही चिंता आहे. अहमदनगरच्या दक्षिण बाजुने हे वादळ पुढे सरकरणार आहे. त्यामुळे नगरमध्य जोरदार पाऊस किंवा सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असेही स्कायमेटने म्हटले आहे.
चक्रीवादळाचा नगरला कमी धोका, स्कायमेटचा अंदाज; नगरच्या दक्षिण बाजूने जात पोहोचणार नाशिकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 15:50 IST