मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने राज्यात 'माझी वसुंधरा' अभियान राबविण्यात येते आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नगर परिषदेच्यावतीने पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू, ध्वनी प्रदूषणातही वाढ होते. राज्य शासनाने पर्यावरण रक्षणासाठी हे महत्वपूर्ण अभियान हाती घेतले आहे. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी सकाळी सात वाजता सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. बांगर यांनी केले आहे. सायकल फेरीत मुख्याधिकाऱ्यांचा मुलांचाही सहभाग
संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल हे देखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.
............
२२सायकल फेरी,
संगमनेर नगर परिषदेच्यावतीने संगमनेरात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.