कर्जत : पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ, शेतीबाबतचे तीन नवे कायदे मागे घ्यावेत, आदी मागण्यांसाठी कर्जत शहरात शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. हा माेर्चा शहरातील एका पेट्रोलपंपावर नेण्यात आला.
कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सायकलीवर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात अक्काबाईनगर येथून झाली. हा मोर्चा शहरातील एका पेट्रोलपंपावर नेण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही भाववाढ डोकेदुखी ठरली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत. ते तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक शहाणे, शहरप्रमुख अशोक डोंगरे, उद्योजक महावीर बोरा, शाहीद झारेकरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.
(फोटो २५ कर्जत आंदोलन)
कर्जत येथे शिवसेनेच्या वतीने सोमवारी पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर निषेध मोर्चा काढला.