शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवर दोष सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:19 IST

अवघ्या पावणेतीन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर शुक्रवारी जिल्हा न्यायालत दोषा सिद्ध झाला.

अहमदनगर : अवघ्या पावणेतीन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर शुक्रवारी जिल्हा न्यायालत दोषा सिद्ध झाला. बाळू गंगाधर बर्डे (वय ३० रा. सोनगाव ता. राहुरी) असे आरोपीचे नाव असून, त्याला ७ आॅगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.शहरातील रेल्व उड्डाणपुलाखाली राहणा-या मजूर कुटुंबातील बालिकेचे आरोपी बाळू बर्डे याने ८ डिसेंबर २०१६ च्या रात्री अपहरण करून तिला केडगाव येथील औद्योगिक वसाहतीत आणले. या ठिकाणी त्याने बालिकेवर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला. अत्याचारानंतर बालिकेला घटनास्थळी सोडून बर्डे फरार झाला. एका कामागाराने त्या बालिकेला पाहिले तेव्हा याबाबत कोतवाली पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस कॉस्टेबल प्रभावती कोकाटे यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पीडित बालिकेच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला. अत्याचार करणारा आरोपी मात्र मागे काहीच पुरावा न ठेवता पसार झाला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरिक्षक संदीप पाटील यांनी तब्बल एक महिना तपास करून आरोपी बर्डे याला नगर येथून ताब्यात घेतले.या बाबत पाटील यांनी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी हा खटला लढविला. या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे अंतीम टप्यातील कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या समोर चालले़ शुक्रवारी आरोपीला या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले आहे. आता शिक्षेवर सरकारी पक्ष व आरोपीपक्षाच्यावतीने ७ आॅगस्ट रोजी युक्तीवाद होणार आहे.निकालाकडे लक्षबालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण नगर शहरासह जिल्ह्यात गाजले होते. त्यामुळे हा खटला संवेदनशील बनला होता. आता यामध्ये आरोपीला काय शिक्षा होते. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.पीडितेवर झाल्या अनेक शस्त्रक्रियाबाळू बर्डे याने पावणेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केला होता.या घटनेमुळे बालिका बेशुद्ध होऊन तिची प्रकृती चिंताजनक बनली होती.नगर येथून तिला उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अडीच ते तीन महिन्यांच्या उपचारानंतर तिला प्रकृती ठिक झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय