शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शनि अमावस्येनिमित्त शनि दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:42 IST

देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था,आरोग्य, प्रसाद, पिण्याचे पाणी, माहिती सुविधा, आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथ-याजवळ मंडप उभा केला होता. तसेच खाजगी जमिनीचा पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे.

सोनई (अहमदनगर) : शनि अमावस्या निमित्त आज (शनिवार दि.4 मे 2019) असलेल्या शनि अमावस्या निमित्त हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.आज आमवस्येला पहाटे 4:03 मि.  सुरुवात झाली असून रविवारी पहाटे 4:15 पर्यंत  दिवसभर अमावस्या असल्यामुळे  भाविकांची गर्दी राहणार आहे .आज शनिवारी पहाटे खासदार चंद्रकांत खैरे,शनिभक्त राकेश कुमार (ऑस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई )यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार उपस्थित होते.

देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था,आरोग्य ,प्रसाद, पिण्याचे पाणी ,माहिती सुविधा, आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथ-याजवळ मंडप उभा केला होता. तसेच खाजगी जमिनीचा पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे.याशिवाय अपंग व जेष्ठ नागरिक यांच्या अल्पशा दरात   वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. "सूर्यपुत्र शनिदेव महाराज कि जय",पवनपुत्र हनुमान कि जय या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता.मंदिर परिसर आकर्षक सजावट करण्यात आली होती.शनैश्वर देवस्थानचे विश्वस्तांनी आलेल्या मान्यवरांचा शाल,श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. 

रस्त्याच्या बाजूंना खेळणी दुकाने आदीमुळे रस्ते फुलले होते.मात्र  जास्त तापमान ,बाहेरील राज्यातील भाविकांची संख्या कमी असल्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी कमी दिसत होती.  भाविकांनी  मोफत अन्नदानाचा लाभ घेताना दिसत होते.मंदिर परिसरात रक्तदान शिबीरात अनेक भाविकांनी रक्तदान केले. गर्दीवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे लक्ष ठेवुन होते.  शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर