शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडच्या विकास कामांसाठी पावणेचार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 20:36 IST

सन २०१७-१८ च्या सहाय्य अनुदानांतर्गत जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग १ ते २१ मधील विकास कामांसाठी ३ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे

जामखेड : सन २०१७-१८ च्या सहाय्य अनुदानांतर्गत जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग १ ते २१ मधील विकास कामांसाठी ३ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन हा निधी प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी दिली.जामखेड नगरपालिकेतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सहा महिन्यापूर्वी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सन २०१७ -१८ मध्ये सर्वसाधारण सभेत जे ठराव मंजूर झाले, त्यासाठी निधीची आवश्यकता होती. पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे अंदाजपत्रकाप्रमाणे निधी मंजूर झाला. याबाबत सर्व तांत्रिक मंजुरी झाल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कामास सुरूवात होऊन शहराच्या वैभवात भर पडणार आहे.पावणेचार कोटीच्या निधीमध्ये राळेभात गल्ली परिसर भूमिगत गटार करणे, मार्केट कमिटी (संताजी मंदिर) जि. प. मराठी शाळेपर्यंत भूमिगत गटार, बीड कॉर्नर ते नवीन पोलीस ठाणे भूमिगत गटार, गणेश टेकाळे घर ते डॉ. झगडे रूग्णालयापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण, नवीन तहसील ते मराठी शाळा भूमीगत गटार, छत्रपती शिवाजी पेठ, महेश कलेक्शन ते आंबेडकर सर्कल सिमेंट काँक्रिटीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर ते गोरोबा टॉकीज सिमेंट काँक्रिटीकरण, बटेवाडी, जगदाळे वस्ती ते खर्डा रोडपर्यंत काँक्रिटीकरण, जांबवाडी येथील दुर्गा मंदिर ते जामखेडकडे येणारा एक कि. मी. रस्ता, लेहनवाडी येथील बाबरवस्तीपासून जामखेडकडे येणारा एक कि. मी. रस्ता डांबरीकरण, श्री मेडिकल ते महावितरण कार्यालय भूमिगत गटार व डांबरीकरण, सदाफुले वस्ती ते फुलमळा रस्ता एक कि. मी. रस्ता भरावीकरण, खडीकरण, डांबरीकरण अशी कामे या निधीतून होणार असल्याचे नगराध्यक्ष घायतडक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड