शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये रंगणार क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:09 IST

सी.जी.पॉवर अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमीटेड, अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला रविवार ( २४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत २४ संघाचा सहभाग आहे.

अहमदनगर : सी.जी.पॉवर अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमीटेड, अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला रविवार ( २४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत २४ संघाचा सहभाग आहे. उद्घाटनाचा सामना महिला संघामध्ये खेळविला जाणार असल्याची माहिती क्रॉम्प्टनचे व्हाईस प्रेसिडेन्ट रमेशकुमार एन. व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. माणिक विधाते यांनी दिली.रविवारी २४ डिसेंबर रोजी स्पर्धेचे वाडिया पार्क क्रीडा संकुलात उद्घाटन होणार आहे. १९ वर्षाखालील २४ संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. सामने ४० षटकांचे असून दररोज एक सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, बीड व परभणी येथील संघाचा सहभाग आहे. तसेच पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यातून प्रत्येकी ३ संघ स्पर्धेत उतरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये व ट्राफी, उपविजेत्या संघास ३१ हजार रुपये अशा स्वरुपाचे बक्षिस दिले जाणार आहे. याशिवाय मॅन आॅफ दि मॅच, सर्वोेत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, मॅन आॅफ द सिरीज अशी विविध बक्षीस दिले जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. १९८६-८७ साली या स्पर्धेला सुरुवात झाली होती. याशिवाय प्रेक्षकांसाठी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. विजयी प्रत्येकास तात्काळ बक्षीस दिले जाणार आहे.

सर्व सामने मॅटवर...

स्पर्धेचे सर्व सामने मॅटवरच होणार आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने टर्फ विकेटसाठी सुरु केलेल्या प्रयत्नांना तांत्रिक अडचणीमुळे यश आले नाही. त्यामुळे अपेक्षित असतानाही यंदा टर्फ विकेट तयार झाली नाही. त्यामुळे यंदाही खेळाडूंना मॅटचाच आधार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर