आॅनलाईन लोकमतराहुरी (अहमदनगर), दि़ २ - वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाई हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या १४ संचालकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक वर्षा काळे यांनी कारवाई केली आहे.गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडिया, मोतीलाल जिरी, सुरजमल जैन, दादा पाटील, भागवत माळी, भगवान वाघ, हितेंद्र महाजन, राजाराम कोळी, इंद्रकुमार लालवाणी, रमजान शेख, ललित सोनवणे, यशवंत जिरी, सुखलाल माळी यांचा समावेश आहे.राहुरी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा १९९९ चे कलम २ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.