शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

दगडफेक प्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST

अहमदनगर : फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री दगडफे क करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर : फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री दगडफे क करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास २० ते २५ जणांचा जमाव कापडबाजारात शिरला. जमाव नालबंद खुंट, पारशा खुंटमार्गे जुना कापडबाजारात शिरला आणि त्यांनी २० ते २५ दुकानांची तोडफोड केली. काही दुकानात घुसून दुकानदारास दमदाटी, शिवीगाळ करून दगडफेक करण्यात आली. दुकानामध्ये संगणकाच्या साहित्याची तोडफोड करण्यात आली. जुन्या कापडबाजारात दुकानाच्याबाहेर उभ्या असलेल्या दुकानदारांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या काचाची तोडफोड केली. जुना मंगळवार बाजार येथील समाधान वॉईन शॉप या दुकानात माजीद असिफ खान आणि जहिद बादशाह खान (रा. पंचपीर चावडी) व त्याच्या दोन अनोळखी साथीदार यांनी दुकानात घुसून काहीएक कारण नसताना शिवीगाळ केली तसेच दमदाटी केली. माजीद खान याने हातात काचेची बाटली धरून दुकानाचा मॅनेजर किशोर अंतुनात चव्हाण याच्या डोक्यात मारून जखमी केले. दुकानाच्या साहित्याची चोरी केली. दुकानाच्या बाजूला उभा असलेला दिगंबर त्रिभुवन यास मारहाण केली. या दोन्ही घटनेप्रकरणी किशोर चव्हाण (वय ५०, मॅनेजर, मूळ रा. सिबलापूर, ता. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दुसऱ्या एका घटनेत पवन ईश्वरलाल गांधी (वय २८, रा. आनंदधाम, खिस्त गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दमदाटी, शिवीगाळ, दगडफेक करून दुकानातील साहित्याची चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र टाकल्याप्रकरणी फेसबुकवरील गुप अडमिन शेख कलिम शेख सिराजोद्दीन (वय २२, रा. मांजरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)