शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
3
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
4
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
5
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
6
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
7
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
8
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
9
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
10
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
11
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
12
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
13
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
14
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
15
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
16
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
17
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
18
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
19
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
20
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची सीएनजी कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल

साई मंदिरातील फुटेज व्हायरल केल्याने गुन्हासाई मंदिरातील फुटेज व्हायरल केल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

शिर्डी : साई संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदिराची पाहणी करत असतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज ...

शिर्डी : साई संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदिराची पाहणी करत असतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल करून तदर्थ समितीची बदनामी केल्याप्रकरणी साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना मंगळवारी (दि.२१) अटक केली.

संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

३१ जुलै रोजी साई संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्य असलेल्या सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पाहणी केली होती. अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असताना दर्शन कसे घेतले, अशी बातमी एका यूट्यूब चॅनेलने प्रसिद्ध केली होती. यात मंदिरातील फोटो व सीसीटीव्ही फुटेजही वापरण्यात आले होते. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज पसरला. तसेच बदनामी झाल्याप्रकरणी अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते.

संबधितांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून यामुळे मंदिर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला, हे सर्व करत असताना हार्डडिक्समधील फोटो डिलिट करण्यात आले. संगणकातील फुटेज घेऊन त्यात छेडछाड केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी साई मंदिर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दाखल

केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.