केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवारी (दि.१५) नामदार प्राजक्त तनपुरे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉलवर खेळविण्यात येणार असून स्पर्धेचे आयोजन डॉन बॉस्को मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक ५ हजार ५५५ रूपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष उद्धव दुसुंगे, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, गौरव कन्स्ट्रक्शन पुणेचे संचालक बाबासाहेब सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
जेऊर येथे क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST