शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावरील गटार फुटली : नागरिकांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:32 IST

अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी ...

अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा व स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले.अनेक दिवसापासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भुमीगत गटार फुटल्याने मैलमिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन त्याचे डबके साचले आहे. या घाण पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये हे मैलमिश्रीत पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुगंर्धीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असताना आरोग्याच्या दृष्टीकोनाने मनपा प्रशासनास जाग आनण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. एका व्यावसायिकाने गटारीवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण टाकल्याने ही भुमीगत गटार फुटली आहे. यामुळे टाकलेल्या कुंपनाच्या आत देखील मैलमिश्रीत पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या भुमीगत गटारीवरील अनाधिकृत कुंपन हटवून या गटारीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, ललिता गवळी, वसुधा शिंदे, यशवंत शिंदे, लक्ष्मण पवार, गणेश दाते आदींसह नागरिक सहभागी झाले होते. या भागात पालकमंत्री, उपायुक्त व महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वास्तव्यास असून देखील या नागरी समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तातडीने या गटारीची दुरुस्ती न झाल्यास नगर-मनमाड रास्ता रोकोचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे