माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ.आर.शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका आरोग्य अधिकारी रुपाली गायकवाड, देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत यावेळी उपस्थित होते.
सध्या कोरोना टेस्ट करूनही किंवा लक्षणे दिसून ही लोक घरी राहून कोरोनाचा प्रसार करीत आहेत. अशा लोकांनी या कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी व आवश्यक ती सर्व औषधे व ॲम्बुलन्स पूर्णवेळ मोफत उपलब्ध असणार आहेत. राहुरी तालुक्यातील ३२ गावांच्या नागरिकांच्या सोयीसाठी सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी आमदार कानडे यांनी सांगितले.
याप्रसंगी मंडल अधिकारी सतीश कानडे, तलाठी दीपक साळवे,अमजद इनामदार,सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.