शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मातापूर खून खटल्यातील आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:03 IST

मारहाण करून एकास जीवे मारल्याच्या आरोपावरून दिगंबर बाबूराव शिरोळे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीस एक लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.

श्रीरामपूर : किरकोळ कारणावरून फावड्याने मारहाण करून एकास जीवे मारल्याच्या आरोपावरून दिगंबर बाबूराव शिरोळे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीस एक लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदारांची तपासणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. मातापूर येथे २० डिसेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. मयत राजेंद्र कचरू शिरोळे याच्याकडून दिगंबर याने कांद्याच्या रोपाची मागणी केली. मात्र ते देण्यास राजेंद्र याने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने दिगंबर याने राजेंद्र याला फावड्याने जबर मारहाण केली. शेतातच घडलेली ही घटना मजूर महिला संगीता चक्रनारायण हिने बघितली. तिने राजेंद्र याच्या कुटुंबीयास याबाबत माहिती दिली.जखमी अवस्थेत साखर कामगार रूग्णालयात नेले असता राजेंद्रला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने मातापूर येथे खळबळ उडाली होती. सहायक पोलीस निरीक्षक के.बी.परदेशी यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पी. बी. गटणे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. बी. एल. तांबे यांनी मार्गदर्शन केले. दंडाच्या रकमेतील ९० हजार रूपये मयताची पत्नी व दोन मुलांना एकत्रित देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय