शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून न्यायालयाचे कामकाज सुरू; दोन सत्रात चालणार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:58 IST

अहमदनगर : उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, २१ सप्टेंबरपासून जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले आहे.

अहमदनगर : उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, २१ सप्टेंबरपासून जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले आहे.

 

न्यायालयातील सुनावणीचे कामकाज सकाळी साडेदहा ते दीड व दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रात होणार आहे. ज्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे, त्या दिवशी त्याच संबंधित वकील व पक्षकारांना न्यायालयीन इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे. लॉयर्स सोसायटीच्या कामकाजासही सुरवात होणार आहे. 

 

नगर जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाच्या नियोजनासाठी नुकतीच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या उपस्थितीत वकील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक झाली आहे, अशी माहिती शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे यांनी दिली. यावेळी सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. 

सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नियमावलीची माहिती जिल्हा व तालुका न्यायालयांना कळविण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी गेटवरच प्रत्येक वकील व पक्षकाराची तापमानाची व ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घेतली जाणार आहे. न्यायालयीन इमारतीत सामाजिक अंतर, मास्क, हात धुणे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सर्वांनी नियमांचे काटेकोर पणे पालन करणे बंधनकारक आहे.

वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी सांगितले की, नव्या नियमानुसार जिल्हा न्यायालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी फक्त कौटुंबिक हिंसाचार व महिला विषयक प्रकरणे, अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कारागृहात असलेल्या आरोपींची प्रकरणे, तसेच उच्च न्यायालयाने कालावधीत ठरवून दिलेली प्रकरणे प्राधान्याने सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. तूर्त न्यायालयीन इमारती मधील वकिलांचे बार व उपाहारगृह बंद ठेवले जाणार आहेत. 

 

वकिलांना कामकाजात अडचण होवू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लॉयर्स सोसायटीचेही कामकाज नियमावलीचे पालन करून सुरू केले जाणार आहे. ज्येष्ठ वकिलांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या कडील प्रकरणांच्या सुनावणीत लेखी म्हणणे सादर करण्यास प्राधान्य द्यावे, असा पर्याय सुचवण्यात आला आहे.

ReplyForward

  
टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय