शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घारगाव परिमंडलात बिबट्यांसह वन्यप्राण्यांची प्रगणना सुरू; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:14 IST

डेहराडून येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या प्रगणनेस शनिवारपासून सुरूवात झाली.

बोटा : डेहराडून येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या प्रगणनेस शनिवारपासून सुरूवात झाली.संगमनेर तालुक्यातील घारगाव वनपरिमंडलातील वनपरिक्षेत्रात ही प्रगणना सुरू झाली आहे. जंगलातील प्राण्यांची संख्या प्रकारानुसार समजण्यासाठी दरवर्षी मे महिन्यातील बौद्ध पौर्णिमेला वन विभागाच्या माध्यमातून ठराविक पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गणना केली जाते. तर डेहराडूनच्या राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने चार वर्षांतून एकदा वन विभाग परिक्षेत्रासह बाहेरही फिरून तसेच ट्रान्झॅक्ट लाईन टाकून बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते.घारगाव वनपरिमंडल असलेल्या घारगाव, नांदूर खंदरमाळ, वनकुटे, बोटा व आंबिखालसा या बीटमधील पंधरा गावांमध्ये साडेसात हजार हेक्टर क्षेत्रफळावर वन विभागाचे कार्यक्षेत्र आहे. या बीटमधील कार्यक्षेत्रात व बाहेरही व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व सुचनेप्रमाणे वनरक्षक व त्यांचे सहकारी सूर्योदयापासून तीन तास फिरून मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती संकलन करीत आहेत. वन्यजीवांच्या पाऊलखुणा, विष्ठा आदींचे छायाचित्रे घेत आहेत. तर ट्रान्झॅक्ट लाईन टाकून मांसभक्षक व तृणभक्षक या सर्वच प्राण्यांची गणना होत आहे. या प्रगणनेमुळे पठारभागातील बिबट्यांसह इतर प्राण्यांची नेमकी आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरforest departmentवनविभाग