शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:31 IST

यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली.

लोकमत बांधावर/ संजय सुपेकर । बोधेगाव : यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली. शेतात उसनवारी करून केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशा अस्मानी संकटामुळे यंदा शेतक-यांची अवस्था ‘घर जाळून कोळशाचे धंदे’ अशी झाल्याचे विदारक चित्र आहे. बोधेगावसह (ता.शेवगाव) परिसरातील बालमटाकळी, लाडजळगाव, चापडगाव, चेडेचांदगाव, सोनविहीर, हातगाव, मुंगी, गदेवाडी, ठाकुर पिंपळगाव आदींसह तालुक्यातील बहुतांशी गावात अतिवृष्टीमुळे पिके मातीमोल झाली आहेत. बोधेगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीने  बोधेगाव, चेडे चांदगाव तसेच लाडजळगाव याठिकाणी भेट देऊन पिकांची पाहणी केली. त्यावेळी पिकांची अतिशय विदारक अवस्था झालेली दिसून आली. बोधेगाव येथील बंकट कणसे, इसाक शेख यांच्या शेतातील कपाशी आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. तर नामदेव गर्जे यांची चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली एकरभर मका जास्त पावसामुळे पूर्णपणे जळून गेली आहे. अभय चव्हाण यांच्या सोंगणी केलेल्या बाजरीचे भिजल्याने कुजून भुसकट झाले आहे. लाडजळगाव येथील महादेव पाटील या वयस्कर शेतक-याचे दीड हेक्टर कपाशी पीक पाण्यात गेले आहे. तर बाजरीला क-हे फुटले आहेत. चेडेचांदगाव येथील संदीप चेडे यांच्या शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला कोंब फुटले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती परिसरातील अनेकांच्या शेतात झाली असल्याचे गोवर्धन ढेसले, मयूर हुंडेकरी, ज्ञानदेव घोरतळे, सुनील गर्जे, राजेंद्र घोरतळे, बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यातील एकूण ५० हजार ४०४ हेक्टरपैकी ६ हजार २०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील. तालुक्यात सर्वाधिक बाजरी व त्या खालोखाल कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आढळून येत आहे, असे शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.   

टॅग्स :ShevgaonशेवगावCrop Insuranceपीक विमा