शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:24 IST

भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे.

अहमदनगर : भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे. महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनाही महापौरांचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे.शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उपनेते राठोड यांनी बुधवारी पत्रकारांना पक्षकार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. पदाधिकारी, नगरसेवकांना दर पाच वर्षाला निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. मात्र गेल्या ५० वर्षांपासून तेच अधिकारी महापालिकेत काम करीत आहेत. विकास कामांबाबत आंदोलने करणाºया, माहितीच्या अधिकारात माहिती मागविणाºया राजकीय कार्यकर्ते, नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी करीत आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळे आणि इतरांच्या दबावाखाली अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करीत आहेत. राजकीय नेत्यांकडून दमदाटी होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. केवळ शिवसेनेच्या विरोधात तक्रार करण्याचे काम महापालिकेतील अभियंते करीत आहेत. आयुक्तांवर धूर फवारणी करणाऱ्यांवर तसेच इतर पक्षाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे धाडस अभियंते दाखवित नाहीत. शहरात उच्चशिक्षित अभियंते बेकार आहेत, मात्र महापालिकेत तांत्रिक जागा भरल्या जात नाहीत. काही अभियंते कमरेला बंदूक लावून काम करीत आहेत. त्यामुळे कोणाची दहशत आहे, हे सांगण्याची गरज नाही, असा सवाल राठोड यांच्यासह शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांनी केला.जे स्वच्छ आणि परदर्शकपणे काम करतात त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलायला भिती वाटत नाही. भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे अभियान फक्त शिवसेनाच राबवू शकते. अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती आल्यानंतर सविस्तरपणे माध्यमांना सांगितले जाईल, असे राठोड म्हणाले.बल्लाळ पुन्हा नगररचना विभागातमहापौर बाबासाहेब वाकळे हेच सध्या नगररचना विभाग चालवित आहेत. एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यानुसार महापौरांनी त्यांच्या आदेशाने बल्लाळ यांनी नगररचना विभागात बदली केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक