शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संशयितांची सोशल मीडियावर नावे उघड केल्याने मनसेच्या शॅडोमंत्र्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या संशयितांची नावे सोशल मीडियावर उघड केल्याने व तशा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शहरातील एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पहिला गुन्हा पुणे येथील मनसेचे पदाधिकारी व शॅडो मंत्रीमंडळातील कृषी व दुग्धविकास मंत्री संदीव पाखरे (रा. लोकमान्य हाऊस, पौंड रोड, रामकृष्ण परमहंस नगर, कोथरुड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोनाच्या संशयितांची नावे सोशल मीडियावर उघड केल्याने व तशा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शहरातील एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पहिला गुन्हा पुणे येथील मनसेचे पदाधिकारी व शॅडो मंत्रीमंडळातील कृषी व दुग्धविकास मंत्री संदीव पाखरे (रा. लोकमान्य हाऊस, पौंड रोड, रामकृष्ण परमहंस नगर, कोथरुड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.कोरोना विषाणूचे रुग्ण व तपासणी केंद्राची माहिती सोशल मीडियात व्हायरल केली होती.  पहिला गुन्हा नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे कैलास काशिनाथ शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे (रा. पौंड रोड, पुणे) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. पाखरे यांनी कोरोनाच्या संशयित रुग्णांची नावे सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यांची ओळख उघड केली. गत आठवड्यात संशयित असलेल्यांपैकी तीन रुग्ण जिल्हा रुग्णालयाकून पळून गेले होते, या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे पत्रच पाखरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते.दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसची तपासणी केंद्र या मथळयाची पोस्ट एका ग्रुपवर टाकली. या प्रकरणी कोतवाली पोलिस तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट व्हायरल करणारे तेजस जीभकाटे, रवींद्र चौबे, सचिन राऊत (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करण्यात आला आहे.आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आदेशाचे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.