शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

Coronavirus : मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 14:43 IST

मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

अहमदनगर - मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन उपस्थित होते.मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व  दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापार्‍यांचा दिवाळा निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. कोरोनाची साखळी बाजारपेठा बंद करुन तुटणार आहे का? हा प्रश्‍न उपस्थित करुन यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र बिघडणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजे पर्यंत व्यापार्‍यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या टाळेबंदीत व्यापारी स्वत:हून बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAhmednagarअहमदनगर