शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देवदैठणमध्ये कोरोनाची इंट्री; संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 11:10 IST

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. 

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.  दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. 

 देवदैठण येथील बसस्थानकाशेजारी राहणा-या एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. या महिलेचा पती शिरूर येथील खाजगी दवाखान्यात सफाई कामगार म्हणून कामाला जात होता. काही दिवसांपूर्वी संबंधित दवाखान्यातील डॉक्टर हीे कोरोनाबाधीत आढळले. या महिलेच्या पतीस त्यानंतर ताप येऊ लागला.

 देवदैठण येथील आरोग्य सेविकांनी या दोघांना श्रीगोंदा येथील उपचार केंद्रात पाठवले. तेथून त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या पतीचा अहवाल येणे बाकी आहे. घरातील अन्य सदस्यांची तपासणी केली जाणार आहे.

 तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, तहसिलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक अरविंद माने दुपारपर्यंत देवदैठण येथे दाखल होत आहेत. त्यांनी या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.  आरोग्यसेविका जयश्री सरोदे, सुनीता यादव, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, वसंत बनकर यांनी गावात तातडीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदा