अहमदनगर : जिल्ह्यात आणखी दहा पाहुण्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व मुंबई येथून जिल्ह्याच्या विविध भागात आले होते. कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे ०२ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. ते यापूर्वीच्या रुग्णाचे नातेवाईक असल्याचे कळते. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष, बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यालाही कोरोना झाला आहे. संगमनेर तालुक्यातील ०५ जणांना कोरोना झाला आहे. यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे आढळून आली होती. त्यालाही कोरोना अहवालही पॉझिटिव्ह. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक हेही बाधिताच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोना झाला आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला. अहमदनगरमधील केडगाव भागात एक महिला मुंबई येथून आली. तिलाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
कोरोना घेऊन आले पाहुणे दहा....कुठे कुठे राहिले पहा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 20:02 IST