शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राशीनच्या ‘त्या’ महिलेच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:08 IST

मुंबईहून सुनेसोबत राशीन येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांपैकी ११ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

राशीन : मुंबईहून सुनेसोबत राशीन येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांपैकी ११ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १३ मे रोजी ही महिला आपल्या सुनेसोबत मुंबई (वाशी) येथून राशीनला आली होती. तिला १६ मे रोजी दम्याचा व घशाचा त्रास जाणवू लागल्याने ती नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी गेली होती. मात्र संबधित विभागाने प्राथमिक उपचार करून त्या महिलेस राशीन येथे क्वारंटाईन करण्यास सांगितले होते. पंरतु दोन दिवसांपूर्वी तिला जास्त त्रास जाणवल्याने तीला नगरला हलविण्यात आले होते. मात्र तिचा वाटेतच मृत्यू झाला. मृत्युनंतर तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तिच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना ताब्यात घेऊन पैकी बारा नातेवाईकांना तपासणीसाठी नगर येथे नेण्यात आले होते. ग्रामपंचायत कर्मचा-यासह पाच जणांना राशीन येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान बारा जणांचे कोरोना अहवाल श्ुक्रवारी रात्री उशीरा हाती आल्याने ११ जण निगेटिव्ह आहेत. सहा वर्षाच्या नातीला बाधा झाली आहे. तर एका जणाचा अहवाल संदिग्ध आहे. आरोग्य प्रशासनाने तो राखून ठेवला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिचा वास्तव्यास असणारी वसाहत प्रशासनाने सील केली आहे. पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ग्रामस्थांमध्ये आता ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात भीती कमी झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKarjatकर्जतhospitalहॉस्पिटल