शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहो ऐकलंत का? फक्त १०० रुपये द्या अन् आरोग्य प्रमाणपत्र मिळवा; अहमदनगरमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:23 IST

कोणतीही तपासणी नाही. चौकशीची कटकट नाही. फक्त नाव सांगा. १०० रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जा, असा धक्कादायक कारभार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरु आहे. शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात सुरु असलेला हा प्रकार कॅमेºयात कैद झाला.

ठळक मुद्देतपासणी मोफत असतानाही घेतले जातात पैसेआरोग्य तपासणी न करताच देतात प्रमाणपत्रजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे दुर्लक्ष

अहमदनगर : कोणतीही तपासणी नाही. चौकशीची कटकट नाही. फक्त नाव सांगा. १०० रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जा, असा धक्कादायक कारभार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरु आहे. शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात सुरु असलेला हा प्रकार कॅमेºयात कैद झाला.कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराला कोणीही बळी पडू नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणण्यासाठी ई-पास देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र कोणतीही चाचणी न करता १०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, याकडे जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांचे दुर्लक्ष झाले आहे.मंगळवारी (दि.२) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अहमदनगर महापालिकेच्या मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रात शब्बीर सय्यद हे आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र घेण्यासाठी दाखल झाले. त्यांना मुंबई येथे जायचे होते. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शब्बीर सय्यद यांची कोणतीही तपासणी न करता किंवा त्यांची काही आरोग्यविषयक चौकशी न करता फक्त नाव विचारले. कोठे जायचे आहे ते विचारले आणि छापिल प्रमाणपत्रावर शब्बीर सय्यद यांचे पूर्ण नाव टाकून प्रमाणपत्र त्यांच्या हातात टेकवले. हे प्रमाणपत्र देताना १०० रुपयांची मागणी केली. सय्यद यांनी संबंधित कर्मचा-याकडे १०० रुपये दिले आणि प्रमाणपत्र घेतले. कोरोनासारख्या महामारीतही आरोग्य यंत्रणा पैसे घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा हा प्रकार कॅमे-यात कैद झाला.

मी आज (मंगळवारी) आरोग्य तपासणीसाठी मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात गेलो होतो. मात्र, माझी त्यांनी काहीही तपासणी केली नाही. इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे साधा तापही तपासला नाही. फक्त नाव विचारले आणि १०० रुपये घेऊन प्रमाणपत्र दिले आहे. हे धोकादायक आहे.

-शब्बीर सय्यद

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस