शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तापमापकही ‘लॉकडाऊन’; तापमानाची होईना नोंद : पारा ४० अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:25 IST

पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्या तापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे सांगण्यात येते.

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये वैशाखाचे ऊन चांगलेच तापले आहे. तापमानाचा पारा ४० अंशावर सरकला आहे. पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्यातापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे सांगण्यात येते.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त झालेले आता उन्हाच्या कडाक्याने चांगलेच हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी व सूर्यास्तानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे दुपारी रस्त्यांवरील गर्दी ओसरलेली आहे. दुपारी उन्हाचा कडाका असह्य होत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेतेही सकाळी दहा ते अकरापर्यंतच रस्त्यावर बसलेले असतात. बँक, हॉस्पिटल, किराणा दुकानातील कामेही नागरिक दुपारच्या आतच उरकून घेत आहेत.पुणे येथील वेधशाळेच्या आयएमडी या संकेतस्थळावर दैनंदिन अहवालामध्ये अहमदनगर येथील तापमानाची नोंद होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अधिकृत तापमानाची माहिती मिळत नाही़ मात्र, इतर संकेतस्थळांवर स्वयंचलित तापमापकांच्या आधारे घेतलेले तापमान ४० वर गेल्याचे दिसते. मात्र, अहमदनगर कॉलेजच्या भूगोल विभागातील तापमापकावरील नोंद अधिकृत नोंद म्हणून ग्राह्य धरली जाते. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे तापमापकावरील नोंद घेतली जात नाही. त्यामुळे पुणे वेधशाळेकडेही तापमानाची नोंद होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षी मे महिन्यात ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान होते. यंदा गतवर्षीपेक्षा तापमान कमी आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे उन्हाचा त्रास कमी जाणवत असण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज सध्या बंद असल्याने दैनंदिन नोंद घेण्यात अडचणी आहेत.-प्रा. एम. जी. उंडे, भूगोल विभागप्रमुख, अहमदनगर कॉलेज

२४ फेब्रुवारीला ‘लोकमत’मधून वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे सध्या घडत आहे. यंदा लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने इंधनाचे ज्वलन कमी झालेले आहे. यंदा हिरवागार परिसर जास्त आहे़ वाळलेल्या गवतावरुन सूर्यप्रकाश जास्त परावर्तित होतो़ परिणामी यंदा तापमान ४० अंशाच्या खालीच आहे. चार-पाच दिवसात पूर्वमोसमी पाऊस होईल व तापमान आणखी कमी होईल. -प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTemperatureतापमान