शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओट्यासाठी तत्काळ अनुदान देण्याची सहकारमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 12:17 IST

‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड विजेत्या पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविल्यास त्यांना पणन विभागाकडून बाजार ओटे बांधण्यासाठी तत्काळ अनुदान देऊ, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली़

ठळक मुद्दे‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्डग्रामपंचायतींना रोजगार निर्मितीसाठी दहा लाखांचे बिनव्याजी कर्ज

अहमदनगर : ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड विजेत्या पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविल्यास त्यांना पणन विभागाकडून बाजार ओटे बांधण्यासाठी तत्काळ अनुदान देऊ, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली़ रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायतींनी काही प्रकल्प हाती घेतल्यास दहा लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणाही त्यांनी केली.

अहमदनगर येथे ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड सोहळा मंत्री देशमुख व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी करणाºया तेरा सरपंचांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘लोकमत’ने राज्यात हा आदर्श उपक्रम सुरु केला आहे. ‘लोकमत’ चा पुरस्कार मिळालेल्या सरपंचांना शासनानेही प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी या सोहळ्यात आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मंत्री देशमुख यांच्याकडे केली. देशमुख यांनी त्यावर लगेच सकारात्मक भूमिका घेत वरील घोषणा केली. नगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘लोकमत’ अ‍ॅवॉर्ड मिळालेल्या पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ओटे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने रोजगारनिर्मिती करणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही पुरस्कार सुरु केले आहेत. तो धागा पकडून त्यांनी रोजगार निर्मितीचे काम करणाºया पंचायतींना कर्ज देण्याची घोषणा केली.

‘लोकमत’च्या सरपंच अ‍ॅवॉर्ड उपक्रमाचे देशमुख यांनी कौतुक केले. पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘असे बदलू गाव’ या विषयावर पोपटराव पवार, राष्टपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील (औरंगाबाद) व नागपूर जिल्ह्यातील शीतलवाडीच्या युवा सरपंच योगिता गायकवाड यांनी सरपंचांशी संवाद साधला. ‘बीकेटी टायर्स’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक तर पतंजली प्रायोजक व महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक आहेत.‘लोकमत’ने उणीव शोधली: मंत्री शिंदेशासनाने आजवर ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार दिले. मात्र, सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारी योजना नव्हती. ‘लोकमत’ने ही उणीव शोधून अशी पुरस्कार योजना सुरु केली आहे. हा अभिनव व प्रेरणादायी सोहळा असल्याचे मंत्री राम शिंदे म्हणाले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsarpanchसरपंच