शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हार-अहमदनगर मार्गाच्या नुतनीकरणाला ठेकेदाराचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 09:50 IST

नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार ते नगर या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ठेकेदाराने बांधकाम विभागाला ठेंगा दाखवित नुतनीकरणाचा आदेशच झुगारला आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे नुतनीकरण करा अन्यथा टोल वसुलीच्या नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी भरपाई विसरा, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देआदेश झुगारलाबांधकाम विभागाने दिली मे पर्यंतची डेडलाइन

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार ते नगर या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ठेकेदाराने बांधकाम विभागाला ठेंगा दाखवित नुतनीकरणाचा आदेशच झुगारला आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे नुतनीकरण करा अन्यथा टोल वसुलीच्या नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी भरपाई विसरा, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला दिला आहे.कोपरगाव ते नगर हा सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सुप्रीम इन्फ्रा या कंपनीला बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर देण्यात आले होते. या मार्गाच्या नुतनीकरणाची, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीवरच आहे़ त्यामुळे कोपरगाव ते नगर या मार्गापैकी कोल्हार ते नगर या मार्गाचे नुतनीकरणाचे काम २०१६-१७ व २०१७-१८ पूर्ण होणे अपेक्षित होते़ हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार सुप्रिम इन्फ्रा कंपनीला आदेश दिले़ ते आदेश पाळले नाहीत म्हणून नोटिसा बजावल्या़ तरीही ठेकेदार कंपनीने अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या मार्गाचे नुतनीकरण केले आहे. अखेरीस ठेकेदार कंपनीला सरकारकडून टोल वसुलीतील नुकसानीबाबत मिळणारी भरपाईची रक्कम थांबविण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी काढला. त्यानंतर सुप्रिम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने कोल्हार ते नगर या एकूण ५५ किलोमीटरपैकी अवघे ८ किलोमीटर अंतराचेच नुतनीकरण केले व त्यापुढील कामही ८ जानेवारी २०१८ पासून थांबविले आहे. आता बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीला मे अखेरपर्यंतच् ाी मुदत दिली आहे.ठेकेदाराची कोर्टात धावनगर-मनमाड महामार्गावर टोल वसुली सुरु आहे़ २०१५ पासून सरकारने टोल वसुलीत कार, जीप यांना वगळले आहे. त्या नुकसानीपोटी सरकारकडून सुप्रिम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला नुकसान भरपाई दिली जाते़ मात्र, कोल्हार ते नगर या ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे नुतनीकरण सुप्रिम इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी करीत नाही. त्यामुळे बांधकाम सचिवांनी सप्टेंबर २०१७ पासून सुप्रिम इन्फ्रा कंपनीला सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई देण्याचे थांबविले आहे. त्याविरोधात ठेकेदार कंपनीने मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतली आहे....अन्यथा पुन्हा टेंडरकोल्हार ते नगर या मार्गावरील खड्डे दुरुस्त करुन सर्व ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर एक इंच जाडीचा डांबरी थर, साईडपट्ट्या, गटार अशी कामे नुतनीकरणात करण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे २० कोटी रुपये अपेक्षित आहेत़ सुप्रिम कंपनीने हे नुतनीकरण न केल्यास त्यांना टोल वसुलीत होणा-या नुकसानी पोटी मिळणारी भरपाई दिली जाणार नाही. पुन्हा टेंडर काढून दुस-या ठेकेदारामार्फत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे यांनी सांगितले़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhighwayमहामार्ग