जामखेड : संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवित होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा इतिहास रचला. तशाच प्रकारे राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप व आरएसएस करीत आहेत, असे भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले़३१ आॅगस्ट या मुक्ती दिनानिमित्त जामखेड येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय भटके - विमुक्त अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या परिषदेचा समारोप झाला. यावेळी आंबेडकर बोलत होते.आंबेडकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळूनही भटके विमुक्त समाजाला न्याय मिळण्यासाठी पंधरा वर्षे लागली. इंग्रज गेले तरी त्यांची कृती कायम आहे. यापुढे समाजाला आपला हक्क पाहिजे असेल, तर निवडणुकीतील एक दिवसाची पाचशेची नोट न घेता माझ्या मागण्या मीच सोडविणार हे ब्रीदवाक्य समोर ठेवून येथील आमदार आणि खासदार मीच हे मनामध्ये कोरून ठेवले पाहिजे. आपण सत्तेत बसल्याशिवाय न्याय मिळणार नाही़ आज भटक्या विमुक्त समाजाने जगण्याची साधने स्वत:च निर्माण केली पाहिजे. ब्रिटिशांनी निर्माण केलेला क्रिमिनल ट्राईब अॅक्ट रद्द करण्यासाठी मुंबईला मोर्चा काढला. त्यानंतर हा कायदा रद्दही झाला, परंतु सवयीने चोरी करणारा नवीन कायदा आणण्याचे काम सरकारमधील मंडळींनी केले. ब्रिटिश गेले परंतु ती प्रवृत्ती मात्र आजही जागेवरच आहे. परिषदेचे संयोजक अॅड. अरुण जाधव म्हणाले, भटके विमुक्त अधिकार राज्यव्यापी परिषदेच्या माध्यमातून राज्यातील या समाजासाठी काम करणाºया विविध संघटनांना एकत्र करून राज्यव्यापी परिषद आयोजित केली आहे. आंबेडकर यांनी या चळवळीला सहकार्य करावे, असे आवाहन करून परिषदेत मांडलेले वीस प्रस्तावांचे वाचन केले व ठराव मंजूर केले. या मागण्या सरकारला देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. बाळासाहेब आरगडे, मधुकर राळेभात, सुभाष लांडे यांचीही भाषणे झाली. आदिवासी समाजातील द्वारका पवार यांनी ३१ आॅगस्ट हा आमचा सण राहील. संविधान आपला धर्म व माणूस आमची जात याप्रमाणे आपण सर्वजण आचरण करू, असे उपस्थितांकडून वदवून घेतले.
राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:19 IST
जामखेड : संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवित होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना ...
राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकरराज्यस्तरीय परिषदेचा जामखेड येथे समारोप