शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री एकनाथ शिंदे, दादासोब भुसे यांच्याकडून कोतकर - ठुबे कुटुंबियांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:01 IST

केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले.

केडगाव : केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले.केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडात मयत झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा सोमवारी दशक्रिया विधीचा कार्यक्रम केडगाव येथे झाला़ यावेळी मंत्री एकनाथ शिंदे , राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सेना नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे व भुसे यांनी कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कोतकर व ठुबे यांच्या पत्नींनी मंत्र्यासमोर आक्रोश सुरू केला. हत्याकांड करणा-या नराधमांना कडक शिक्षा करा, अशी मागणी त्यांनी केली.शिंदे म्हणाले, राज्यात कधीच सेनेबाबत अशी दुदैवी घटना घडली नाही. सेनेच्या दोन निष्ठावान कार्यकत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यांनी कोणी हे हत्याकांड केले असेल त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. शिवसेना एक कुटुंब असून पक्ष कोतकर व ठुबे परिवारासोबत कायम राहिल.भुसे म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही दुर्घटना गांभीर्याने घेतली असून त्यांच्या आदेशानेच आम्ही येथे आलो आहे. यावेळी अनिल राठोड, आमदार विजय औटी, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, प्रा़ शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसैनिकांची अटक टाळली

केडगाव हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी केडगावमध्ये दगडफेक केली, मृतदेह रुग्णालयात नेऊ दिले नाहीत. त्यामुळे सुमारे ६०० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत. मात्र, अद्याप एकाही शिवसैनिकाला अटक करण्यात आलेली नाही. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आरोपींना अटक होईल, अशी चर्चा होती. दशक्रिया विधीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसासमोरच आरोपी खुलेआम मिरत होते. मात्र, पोलिसांनी एकाही शिवसैनिकाला अटक करण्याची हिंमत दाखविली नाही.

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडEknath Shindeएकनाथ शिंदेAhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना