शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार जाणार भाजपात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे थोड्याच वेळात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हा सोहळा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे थोड्याच वेळात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हा सोहळा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.विखे भाजपात गेल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपात जाण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेही या सोहळ््यासाठी रवाना झाले आहेत. यासह महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवकही रवाना झाले आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

अहमदनगर पालिकेतील काँग्रेस नगरसेवक भाजपात?महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकांचे पतीराज डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेश सोहळ््यास मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाणार की केवळ प्रवेश सोहळ््याला उपस्थित राहणार? याबाबत तर्कवितर्क आहेत.शहर काँग्रेसने महापालिकेची निवडणूक डॉ. सुजय विखे यांच्याच नेतृत्वाखाली लढविली होती. केडगावचे काँग्रेसचे उमेदवार अचानकपणे भाजपात गेले. त्यामुळे विखे यांना मोठा धक्का बसला होता. मात्र विखे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले. हे नगरसेवक विखे यांनाच मानणारे आहेत. रुपाली वारे, संध्या पवार, शेख रिजवाना, शीला चव्हाण, सुप्रिया जाधव या काँग्रेसच्या पाच नगरसेविका आहेत. शीला चव्हाण यांचे पती दीप चव्हाण सध्या शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे चव्हाण वगळता अन्य नगरसेविकांचे पतीराज डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेश सोहळ््यास हजर राहणार आहेत. यामुळे आता काँग्रेसच्या पाचही नगरसेविका लोकसभेत भाजपचा प्रचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

खासदार गांधी परतले...शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना नगरला येत डॉ.सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केली. यानंतर तातडीने खासदार दिलीप गांधी यांनी दिल्ली गाठली. दिल्लीनंतर काल ते मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ‘ सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून अद्याप पण उमेदवारीचा  निर्णय झालेला नसल्याचे सांगत त्यांनी गांधी यांची समजूत काढली. त्यानंतर खासदार दिलीप गांधी नगरला परतले आहेत. मात्र खासदारकीच्या तिकिटाचा शब्द घेऊनच डॉ.विखे भाजपात दाखल होत आहेत्

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर