शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
5
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
6
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
7
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
8
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
10
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
11
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
12
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
13
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
14
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
15
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
16
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
17
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
18
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
19
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

काँगे्रस-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: October 9, 2016 01:06 IST

अहमदनगर : आगामी काळात राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

अहमदनगर : आगामी काळात राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. मिनी विधानसभेप्रमाणे होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक र्त्यांच्या भावना समजून घेण्यात येत आहे. यात कार्यकर्त्यांची इच्छा ‘स्व’बळाची असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी नगरमध्ये दिली.नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आ. जगताप पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते. जगताप म्हणाले, काँग्रेस पक्षाने २८८ मतदारसंघांसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढण्यात येणार आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात निरीक्षकांसह विखे आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. कार्यकर्त्यांचा आढावा घेतल्यानंतर गत पाच वर्षांत त्यांचे मनोबल वाढलेले दिसत आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांत काँग्रेस वगळात अन्य पक्षांतील नेते भाजपात गेलेले आहेत. काँग्रेस त्याला अपवाद आहे. यंदा पक्षाला चांगली परिस्थिती आहे. यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील. कार्यक र्त्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी आहे. समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची वेळ आली, तरी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात येईल. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसची आहे. त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार गतनिवडणुकीत विजयी झाला होता. ती जागा काँग्रेसची आहे. या जागेवर राष्ट्रवादीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे जगताप यांनी यावेळी ठणकावले. १९९९ आणि २०१४ ला दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढलेले आहेत. उर्वरित निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. ही एकत्रित निवडणूक प्रासंगिक करार समजावा, असे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची धमकीची भाषा त्या पदाला शोभत नाही. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी कामाचा ठसा दाखवावा. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धमक्यांची भाषा करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात गंभीर प्रश्न असताना मुख्यमंत्र्यांना गाणी, कविता, शेरोशायरी सुचत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. लोणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार आहे. नगरपंचायत आणि नगरपालिकासांठी स्वतंत्र बैठक होणार असून, तयारी सुरू करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी दिला़ राष्ट्रवादीची बैठक बाभळेश्वर (ता़ राहाता) येथे झाली़ यावेळी वळसे बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले होते. जि़ प़ अध्यक्षा मजूषा गुंड, रावसाहेब म्हस्के, कपिल पवार, तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, अ‍ॅड. गोकुळ धावणे, अ‍ॅड. नारायण कार्ले, सुरेंद्र खर्डे आदी उपस्थित होते.४जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. म्हणूनच स्वबळावर लढणार आहोत. राज्यात युती शासनाने पत गमावली आहे़ शेतकरी, सामान्य जनतेला शासनाने वाऱ्यावर सोडले आहे़ तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत. निळवंडे धरणाला आपण गती दिली, पण या सरकारकाडून कालव्यांसाठी निधी मिळत नाही. आता सर्वांनी कामाला लागा, पुन्हा एकहाती सत्ता आण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावसाहेब म्हस्के, अ‍ॅड. गोकुळ धावणे, सुधीर म्हस्के, उत्तमराव घोरपडे आदींची भाषणे झाली.