शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील अतिक्रमणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच : नामदेव राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:22 IST

दावल मलिक दर्गा परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

कर्जत : दावल मलिक दर्गा परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचीच ही अतिक्रमणे आहेत. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा या अतिक्रमणात थेट संबंध आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. तसेच राजकीय पक्षांनी तौसिफ शेख यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.कर्जत नगरपंचायतमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, तौसिफ शेख यांचा आत्मदहनात मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दु:खद आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायत पूर्णपणे पाठपुरावा करीत होती. त्या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध आहेत. तौसिफ शेखच्या आत्मदहनानंतर शुक्रवारी घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला. त्यात विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी नगरपंचायत व पालकमंत्र्यांवर विविध आरोप केले. परंतु दावल मलिक दर्ग्याच्या जागेशी आंदोलनात भाग घेणाऱ्या बहुतांश नेत्यांचा संबंध व अतिक्रमण आहे. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा त्या जागेतील अतिक्रमणात थेट सबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व त्यांच्या सहकाºयांनी अतिक्रमित जागेचा करार केला आहे. काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ यांचे निकटवर्तीय नगरसेवक संदीप बरबडे यांचा या जागेशी संबंध आहे. अ‍ॅड. कैलास शेवाळे यांच्या बंधूचे पक्के बांधकाम आहे. नगरसेवक सचिन घुलेंचा अतिक्रमण गाळ्यात थेट संबंध आहे. नगरसेवक मोनाली तोटे यांचे पती यांचाही समावेश असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राऊत यांनी यावेळी केला. तौसिफ शेख हे दावल मलिक दर्ग्याच्या जागेवरील सर्व अतिक्रमण काढावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती, मग या नेत्यांच्या अतिक्रमणाचे काय? यात पालकमंत्री व नगरपंचायत यांचा संबंध नाही. आमच्यावर व पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या नेत्यांनी मुस्लिम समाज व आमची माफी मागावी, अशी मागणीही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.परवानगी घेऊनच जागा मिळविल्या : राजेंद्र फाळकेदावल मलिक दर्ग्याच्या साडे चार एकर जागेसाठी मी धर्मादाय आयुक्तांकडे १०वर्षांपूर्वी रितसर परवानगी मागितली आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर ती जागा रितसर घेण्याचा मला अधिकार आहे. सध्या त्या जागेशी माझा संबंध नाही. धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेऊन काहींनी त्या जागा मिळविल्या आहेत. - राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत