शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सरशी , भाजपाची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 16:33 IST

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मिळवत तब्बल प्रत्येकी ११ जागा मिळवल्या. त्याखालोखाल भाजपाने ९ जागा मिळवल्या तर सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादी प्रत्येकी ११, भाजपा ९ ,  क्रांतिकारी पक्ष २, सेना १, जनशक्ती १, महाआघाडी १ जिल्हा नियोजन समितीच्या ३६ जागा

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मिळवत तब्बल प्रत्येकी ११ जागा मिळवल्या. त्याखालोखाल भाजपाने ९ जागा मिळवल्या तर सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला. जिल्हा नियोजन समिती सदस्यची मतमोजणी प्रक्रिया आज मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या मुख्य उपस्थितीत सैनिक लॉन येथे पार पडलि. मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या ३६ जागांसाठी मतदान पार पडले होते. तब्बल ९७ टक्के मतदान झाले होते. 

 आज सकाळी मतमोजणीस सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे ९, काँग्रेसचे ११,  राष्ट्रवादीचे ११,  क्रांतिकारी पक्षाचे २, सेना १, जनशक्ती १ तर महाआघाडीचा १ उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.  जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवगार्तील ९ जागांसाठी १० उमेदवार होते. जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी एकूण ८ जागा होत्या. सर्वसाधारण गटातून काँग्रेसचे राजेश परजणे, भाजपाचे जालिंदर वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्र्रभावती ढाकणे तर जनशक्तीच्या हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या पुष्पा वराळ, शरद झोडगे  व गुलाबराव तनपुरे यांना पराभव स्विकारावा लागला. नागरिकांचा मागास प्रवगार्साठी ५ जागेसाठी ६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये रामहरी कातोरे, सुनील गडाख, शिवाजी गाडे, दत्तात्रय काळे व प्रताप शेळके यांनी विजय मिळविला. शिवसेनेचे नेते अनिल कराळे यांना पराभव स्विकारावा लागला. नगरपंचायत मतदार संघातील खुल्या गटात १ महिलेसाठी आरक्षित असणा-या जागेवर सोनाली नायकवाडी विजयी झाल्या. नगरपालिका सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असणा-या जागेवर राष्ट्रवादीच्या उषाबाई तनपुरे विजयी झाल्या. नगरपालिका अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर संतोष कांबळे हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी चंद्रकला डोळस यांचा पराभव केला. नगरपालिकेतील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर महाआघाडीच्या स्नेहल खोरे विजयी झाल्या त्यांनी मंगला गाडेकर यांना पराभूत केले.

  • विजयी उमेदवार :

जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवर्ग - राजश्री घुले (राष्ट्रवादी काँग्रेस), आशा दिघे (काँग्रेस), अनुराधा नागवडे (काँग्रेस), रोहिणी निघुते (काँग्रेस), सुप्रिया पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुनिता भांगरे (भाजप), राणी लंके (शिवसेना), दिपाली गिरमकर (भाजपा) आणि विमल आगवण (राष्ट्रवादी काँग्रेस)

जिल्हा परिषद सर्वसाधारण गट - राजेश परजणे (काँग्रेस) जालिंदर वाकचौरे (भाजपा), प्रभावती ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस), हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते (जनशक्ती) 

नागरिकांचा मागास प्रवर्ग - रामहरी कातोरे, सुनील गडाख, शिवाजी गाडे, दत्तात्रय काळे व प्रताप शेळके

नगरपंचायत मतदार संघातील खुला गट -  सोनाली नायकवाडीनगरपालिका सर्वसाधारण महिला गट - उषाबाई तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)नगरपालिका अनुसूचित जाती - संतोष कांबळे नगरपालिका नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -  स्नेहल खोरे (महाआघाडी)