शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

संगमनेरकरांच्या खिशाला मीटरची झळ

By admin | Updated: May 3, 2016 23:48 IST

संगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नाराजी : पाणी पट्टीपेक्षा दुप्पट दराने पाणीसंगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी, अपव्यय टाळावा, या उद्देशाने पालिकेने प्रायोगिक तत्वावर वडजे मळा व मेहेर मळा भागातील पाणी टाकीवर अवलंबून असलेल्या १ हजार ७०० नळधारकांच्या नळांना मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपदा एजन्सीमार्फत जवळपास ४० टक्के पूर्ण मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात संपूर्ण शहरामधील एकूण १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले जाणार आहेत. पालिका नळधारकांकडून दरवर्षी १ हजार ७०० रूपये प्रमाणे पाणीपट्टी आकारते. आता मीटर बसविल्यावर १ पैसा लीटर प्रमाणे दर आकारणी करण्याचे पाणी पुरवठा समितीने ठरविले आहे. एका कुटूंबात कमीत कमी ५ माणसे असतील तर त्यांना दररोज सरासरी किमान १ हजार लीटर पाणी लागते. १ पैसा प्रती लीटरनुसार १ हजार लीटर पाण्याला दररोज मीटरद्वारे १० रूपये, दरमहा ३०० तर वर्षाला ३ हजार ६०० रूपयांची आकारणी होईल. म्हणजेच १ हजार ७०० रूपयांऐवजी आता दुपटीपेक्षा जास्त पैसे पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत. पाण्यासाठी छूपी वाढ होणार असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपलेली असताना मीटरद्वारे पाण्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) आम्ही नगरपरिषदेच्या मिटींगमध्ये हा विषय वारंवार निदर्शनास आणून दिला. ही योजना परवडणारी नाही. किमान ४ ते ५ हजार पाणीपट्टी भरावी लागेल. व्यावसायिकांचे तर कंबरडे मोडेल. नागरिकांनीच याला विरोध केला पाहिजे. पूर्वीच्या पाणीपट्टीच्या वरचा निम्मा बोजा शासनाने उचलावा. म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही. - कैलास वाकचौरे, नगरसेवक