कुळधरण : राज्याच्या महसूल विभागात ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमबजावणीबाबत कर्जत तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे तहसीलदारांचे एक वर्षापुर्वीचे आदेश आहेत. मात्र तालुक्यातील अनेक भागात आजही हस्तलिखीतातील सात-बारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकऱ्यांना तासन् तास तलाठी कार्यालयात ताटकळत थांबावे लागते. तलाठ्यांकडे अनेक गावांची सूत्रे असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ‘शासन आपल्या दारी’चा नारा दिला जात असला तरी शेतकऱ्यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असते. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याच्या दारी हेलपाटे मारावे लागतात. तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे. कोपर्डीचे तलाठी सरोदे यांनी या संदर्भात सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार आम्ही संगणकाची खरेदी केली आहे. उताऱ्यासाठी आकारलेल्या पंधरा रुपयांतील पाच रुपये शासनाकडे भरावयाचे असून दहा रुपये संगणक खरेदीच्या रकमेच्या वसुलीसाठी ठेवायचे आहेत (वार्ताहर)तर संबंधितांवर कारवाई बारा गावे वगळता तालुक्यातील सर्व गावांचे उतारे संगणकावर उपलब्ध आहेत. संगणकीय उतारे पुरविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यास पाहणी केली जाईल. उताऱ्यांमागे १५ रुपयांपेक्षा अधिक रकमेची आकारणी होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- जयसिंग भैसडे, तहसीलदार, कर्जतशेतकऱ्यांची लूटसंगणकावरील उतारा काढण्यासाठी जास्त खर्च येत असल्याचे सांगत काही तलाठी कार्यालयातून उताऱ्यामागे तीस रुपयांची आगाऊ वसुली केली जाते. संगणक घरी असल्याने जादा पैसे देऊनही वेळेत कामे होत नाही. ही दुकानदारी चक्क रविवारीही सुरु असते.
संगणकीय सात-बाराचे तीनतेरा
By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST