शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्पिरिटच्या टँकरबाबत मंत्र्यांकडे तक्रार; तपास का रखडला? याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:16 IST

नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात अवैध स्पिरिट घेऊन जाणारा टँकर पकडला होता़ मात्र, या अवैध स्पिरिटबाबतचा तपास खडल्याने या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील पथकाने १४ मार्च रोजी नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात अवैध स्पिरिट घेऊन जाणारा टँकर पकडला होता़ मात्र, या अवैध स्पिरिटबाबतचा तपास खडल्याने या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.या तक्रारीत चंगेडे यांनी म्हटले आहे, उत्पादन शुल्कच्या पथकाने बाभळेश्वर परिसरात पकडलेल्या स्पिरिटच्या टँकरचा तपास गेल्या दीड महिन्यांपासून रखडला आहे. उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघा टँकर चालकांकडे गेटपास मिळून आले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघा चालकांना दुसºया दोघांनी श्रीगोंदा परिसरातील टोल नाक्याजवळ हा स्पिरीटचा टँकर दिला होता. या टँकर चालकांच्या जबाबात विसंगती आहे. हा टँकर धुळे येथे जात होता. तेथे कुणाला हे स्पिरिट देण्यात येणार होते व कोणत्या कारखान्यातून हे स्पिरिट खरेदी केले. यासंदर्भात अद्यापपर्यंत काहीच तपास झालेला नाही. यासंदर्भात आपण स्वत: लक्ष घालून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असे या तक्रारीत म्हटले आहे.काय आहे प्रकरणउत्पादन शुल्कने १४ मार्च रोजी पकडलेल्या टँकरमध्ये २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर स्पिरिट (मद्यार्क) जप्त केले. यावेळी टँकरमधील दोघांना अटक करण्यात आली. हे स्पिरिट धुळे येथे गावठी दारू तयार करण्यासाठी नेण्यात येत होते. या प्रकरणाचा उत्पादन शुल्कचे श्रीरामपूर येथील निरीक्षक अनिल पाटील हे तपास करत आहेत. दरम्यान पाटील यांच्या पथकाने या प्रकरणात आणखी दोघा टँकर चालकांना अटक केली. मात्र, हे स्पिरीट कोणत्या कारखान्यातून खरेदी केले होते, हे समोर आलेले नाही. दरम्यान या संदर्भात या प्रकरणाचे तपासी अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

स्पिरिट टँकरसह उत्पादन शुल्क विभागातील अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्याचा तपास रखडलेला आहे. यासंदर्भात मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहे, असे आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर