शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर पालिकेचे निम्मे नगरसेवक चौकशीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:51 IST

निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण या विचाराला फाटा देत श्रीरामपूर नगरपालिकेत शंभर टक्के राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण या विचाराला फाटा देत श्रीरामपूर नगरपालिकेत शंभर टक्के राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. जिरवाजिरवी व शह-काटशहामुळे तब्बल अठरा नगरसेवक अपात्रतेच्या कारवाईचा व वेगवेगळ्या चौकशींचा सामना करीत आहेत. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यादेखील या चक्रात अडकल्या आहेत.महाआघाडीच्या गटनेत्या भारती कांबळे व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवी पाटील यांना मंगळवारी संध्याकाळी उशिरा न्यायालयाची नोटीस मिळाली. अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप एजाज पठाण यांनी करीत दोघांवर न्यायालयात दावा ठोकला आहे. अशा प्रकारचे न्यायालयाचे झेंगट लागलेले हे दोघे पालिकेतील अठरावे नगरसेवक (एकूण ३४ सदस्य) ठरले आहेत. नगरपालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.दिवंगत ज.य.टेकावडे, मधुकरराव देशमुख, रामचंद्र महाराज उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार जयंत ससाणे या दिग्गज नेत्यांची नगरपालिकेला परंपरा राहिली आहे. टोकाच्या राजकारणातही व्यक्तिगत द्वेश व हेवेदावे बाजूला सारले गेले. आता मात्र तब्बल थेट अपात्रतेच्या कारवाईच्या नोटिसांनी पालिकेचे वर्तुळ ढवळून निघाले आहे.दस्तुरखुद्द नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, राजेंद्र पवार, मुजफ्फर शेख, रवी पाटील, भारती कांबळे हे नगरसेवक चौकशींचा सामना करीत आहेत. यातील अनेक जणांवर थेट अपात्रतेचे संकट घोंगावते आहे.दरम्यान, काँग्रेस नगरसेवक अंजूम शेख यांच्यासह दहा नगरसेवक उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पक्षांतर बंदी कायद्याच्या एका खटल्याचा सामना करीत आहेत. अजून काही नगरसेवक या फेऱ्यात अडकण्याची चर्चा आहे.नगरसेवकांच्या नगर-औरंगाबाद-दिल्ली व्हाया मुंबई अशा खेटा सुरू आहेत. या सर्व प्रकारात अनेक नेत्यांनी वकिलांची मोठी फौजच दिमतीला ठेवल्याचे चित्र आहे. शहरात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.बदली, अपशब्द,पक्षांतर बंदी, बांधकामाच्या तक्रारीनगराध्यक्षा अनुराधा आदिक : नवरात्रोत्सवातील खर्चाला मान्यता, शिक्षण मंडळाच्या कर्मचाºयासह वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या बदलीचे आदेश यासह इतर काही तक्रारी.संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे : बांधकामाविरोधात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार.मुजफ्फर शेख : नगराध्यक्षांविरोधात सर्वसाधारण सभेत अपशब्द वापरल्याची तक्रार.अंजूम शेख, शामलिंग शिंदे, बाळासाहेब गांगड, ताराचंद रणदिवे, समिना शेख, राजेश अलघ, हेमा गुलाटी यांच्यासह दहा नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत तक्रार.रवी पाटील आणि भारती कांबळे : बांधकामाविरोधात तक्रार.नगराध्यक्षा आदिक चौकशीच्या फे-यातन्यायालयाचे झेंगट लागलेले हे दोघे पालिकेतील अठरावे नगरसेवक (एकूण ३४ सदस्य) ठरले आहेत. नगरपालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.नगराध्यक्षा अनुराधा आदिक यादेखील या चक्रात अडकल्या आहेत. नगरसेवकांच्या नगर औरंगाबाद-दिल्ली व्हाया मुंबई अशा खेटा सुरू आहेत. अजून काही नगरसेवक या फेºयात आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर