शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

 35 लाखांच्या ठेवी बुडवणा-या धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्ष-संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 10:47 IST

अहमदनगरमधील काष्टी येथील धनश्री ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेत संस्थेच्या अध्यक्ष ज्योती गवळी व तिचा पती रमेश गवळी यांनी संगनमतानं लाखो रुपयांचा गैरव्यवहार व्यवहार केला आहे.

श्रीगोंदा (अहमदनगर) : काष्टी येथील धनश्री ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेत संस्थेच्या अध्यक्ष ज्योती गवळी व तिचा पती रमेश गवळी यांनी संगनमतानं लाखो रुपयांचा गैरव्यवहार व्यवहार केला आहे. अंबादास भानुदास राहिज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 35 लाख रुपयांच्या ठेवी बुडविल्याचा संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या सर्वांविरोधात फसवणुकीता गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची सूत्रे ताब्यात घेतली असून ठेवीदारांच्या तक्रारीत वाढ झाली तर संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

रमेश गवळी यांनी आपली पत्नी ज्योती गवळी यांच्या अध्यक्षतेखाली धनश्री महिला सहकारी संस्थेची स्थापना केली. उपाध्यक्षपदी डॉ. पवार यांची वर्णी लावली. जादा व्याजाचे गाजर दाखवून ठेवी जमा करण्यास सुरुवात केली. रमेश गवळी हा स्वत:  दैनंदिन ठेवी जमा करीत होता. अंबादास राहिंज व डॉ. पांडुरंग नारायण दातीर यांनी धनश्री पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम व्याजासह मागणी केली. मात्र रमेश गवळी याने ठेवीची रक्कम न देता ठेवीदाराच्याच विरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी अंबादास राहिंज यांना दिली. 

गेल्या चार महिन्यांपासून धनश्री पतसंस्थेचे कार्यालय बंद केले. त्यामुळे  एकच खळबळ उडाली असून अनेक ठेवीदारांनी आपल्या पैशांची मागणी केली असल्याचे समजते. काही ठेवीदारांना मी तुमचे पैसे देतो, तुम्ही गुन्हा दाखल करू नका असे सांगून ठेवीदारांमध्ये उभी फुट पाडल्याचे पोलिसांनी सांगितले. संचालक मंडळाची मालमत्ता जप्त धनश्री पतसंस्थेत मोठी आर्थिक गडबड झाली आहे. अंबादास राहिंज यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरून ठेवीदारांचे पैसे वसुल करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाई करणार आहे. - बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा