शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ओढे, नाल्यांतील अतिक्रमणे हटविण्याचा आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:54 IST

शहरासह उपनगरातील ओढे व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा आणणारी पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बुधवारी संबंधितांना दिला़

अहमदनगर : शहरासह उपनगरातील ओढे व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा आणणारी पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बुधवारी संबंधितांना दिला़शहरात पडलेल्या पावसाचे पाणी मध्यंतरी नागरिकांच्या घरात घुसले होते़ पावसाचे पाणी घरात घुसून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले़ पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत, अशी नगरसेवकांची मागणी होती़ या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त भालसिंग यांनी गेल्या आठवड्यात सावेडी उपनगरातील नरहरीनगर, नंदनवन वसाहत, निर्मलनगर, गावडे मळा, कैलास हाऊसिंग सोसायटी आदी भागात पाहणी केली़ या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी ओढे बुजवून त्यावर पक्के बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते़ त्याचा अहवाल अतिक्रमण विभागाने आयुक्तांना सादर केला़ त्याआधारे आयुक्तांनी नगररचना विभागाने नैसर्गिक ओढे व नाल्यांना बाधा आणाणारे रेखांकन दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी, नव्याने परवानगी देताना ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येणार नाही, याची खात्री करावी, बांधकाम विभागाने मोठ्या नाल्यांचे पिचिंग काम सुरू करावे, तसेच ज्या ठिकाणी पाईप टाकून ओढे नाले बंदिस्त करण्यात आले आहेत, अशा ठिकाणचे पाईप काढून प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ याशिवाय शहरासह उपनगरांत ओढे व नाल्यांतील पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ संबंधित विभागांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय