अहमदनगर : येथील रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत मंगळवारी (दि. २२) मोफत एच.आय.व्ही. तपासणी शिबिर घेण्यात आले. उद्घाटन प्रा. डॉ. सचिन घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी शंकरराव खेमनर व दीपक फिरोदिया उपस्थित होते. २१ व्या शतकात मानव जातीला एड्स ही एक भेडसावणारी समस्या निर्माण झाली आहे. जागतिक अहवालानुसार ८५ टक्के बाधित हे १५ ते ४९ या वयोगटातील आहेत. या शिबिरात ५० जणांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. यासाठी साकुर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉ. विकास वाळुंज यांचे साहाय्य लाभले. यावेळी उपप्राचार्य प्रा. आर. आर. गिरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. टी. खेमनर, ग्रंथपाल प्रा. राशिनकर, प्रा. कुलकर्णी, प्रा. हिंगे, प्रा. पी. आर. खेमनर, प्रा. एस. ए. मुन्तोडे यांच्यासह प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. खेमनर यांनी केले व प्रा. प्राजक्ता बिडवे यांनी आभार मानले.
फोटो -२४ सचिन घोलप
रमेश फिरोदिया महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. सचिन घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी.
----------------------
युनियन बँक ऑफ इंडिया व महापालिकेतर्फे कर्ज वितरण
अहमदनगर : येथील नगर महाविद्यालयाजवळील युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महापालिका उपायुक्त दिनेश सिनारे व बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली यांच्या हस्ते नागरिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले. या कर्ज वितरण मेळाव्यात सचिन राऊत, अवधेश ठाकूर, बँकेचे प्रबंधक संदीप वाळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली म्हणाले, कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले, तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. साधनसामग्री उपलब्ध करून स्वत:चा व्यवसाय थाटण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून सरकारने गोरगरिबांसाठी कर्ज प्रक्रिया चालू केली आहे. हे कर्ज घेऊन पूर्णपणे व्यवस्थित फेड केली असता पुढच्या वेळेस अधिक कर्ज मिळणार आहे. महापालिका उपायुक्त दिनेश सिनारे यांनी या योजनेचा जास्तीत जास्त गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी युनियन बँकेचे क्षेत्रीय उपप्रमुख विजया सारधी, मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर साळुंखे, मनोज कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी सदाफळ यांनी केले. यशस्वितेसाठी सचिन शिरसाठ, समीर शेख, मुशीर खान, अच्युत देशमुख यांनी परिश्रम घेतले.
--
फोटो-२४ युनियन बॉंक
युनियन बँक ऑफ इंडिया व महापालिका यांच्यातर्फे आयोजित कर्ज वितरण मेळाव्यात कर्जाचे वाटप करताना उपायुक्त दिनेश सिनारे. समवेत बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली, सचिन राऊत, अवधेश ठाकूर, प्रबंधक संदीप वालवलकर, विजया सारधी, ज्ञानेश्वर साळुंखे आदी.