अहमदनगर : माल वाहतुकीसाठी दमदार अशी ओळख असलेल्या टाटा ४०७ पिक अप गोल्ड नगरमधील एमआयडीसीतील शुभयान ऑटो येथे उपलब्ध आहे. व्यावसायिक भरारीसाठी टाटा ४०७ पिक अप गोल्ड शुभयानमध्ये फक्त ८.९९ लाखांमध्ये व झीरो डाऊन पेमेंटमध्ये मिळवण्याची संधी आहे. टाटा मोटर्सचा हा टेम्पो अत्याधुनिक सुविधांसह शुभयानमध्ये असून खास ऑफरमुळे ग्राहकांना अधिक लाभ मिळेल, अशी माहिती शोरूमचे जनरल मॅनेजर अशोक बोठे यांनी दिली. टाटा ४०७ पिक अप गोल्डच्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती देताना बोठे म्हणाले, या टेम्पोमध्ये पॉवर स्टेअरिंग असून जास्त माल बसेल असा ८.५ फूट लांबीचा व ६.५ फूट रुंदीचा हौदा आहे. ४० हजार कि.मी. सर्व्हिस इंटरव्हल, ३ लाख कि.मी. किंवा ३ वर्षे वारंटी, १० लाखांपर्यंत ड्रायव्हर विमा, २.२ टन वजन क्षमता, मोबाइल चार्जर, टाटा ओके एक्स्चेंज सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहिती व खरेदीसाठी ग्राहकांनी शुभयान ऑटोच्या नगर, अकोले, संगमनेर येथील शोरूमला प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो- २४ टाटा ४०७
--------------------------------------
महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्राकडून
अर्थसाहाय्य
अहमदनगर : बुरूडगाव रोड परिसरातील अनेक कुटुंबांकडे घरकाम करणारी गरीब महिला संगीता या कर्करोगाने त्रस्त होत्या. हातावर पोट असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे खूप चिंतेत असलेल्या या भगिनीस महावीर इंटरनॅशनलच्या वीरा केंद्र सदस्यांनी मदत केली. अध्यक्षा उज्ज्वला बोथरा, सचिव सुरेखा संचेती यांनी त्या महिलेस गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व संपूर्ण उपचाराचा खर्च केला. यामुळे मोठ्या आजारातून त्यांची मुक्तता केली. यावेळी अनेक वीरा सदस्या, डॉक्टर्स व परिचारिका उपस्थित होत्या. वीरा केंद्राच्या दातृत्वाबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, नरेंद्र बाफना व सर्व वीर सदस्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
-------------------------